Share

सुशांत सिंग राजपूत साठी रामदेव बाबांचे हवन…

Published On: 

हरिद्वार : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून बाबा रामदेव यांनी यज्ञ केला आहे. तसेच सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथे हवन केले. वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांतने आपल जीवन संपवलं होत. या घटनेला आता दोन महिने उलटले आहे. बाबा रामदेव म्हणाले की, आता निदान त्यांच्या दिवंगत सुशांतच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. रामदेव बाबांनी या हवनाचा व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा यांनी सुशांत आणि त्याच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्याविषयी बोलत आहेत. बाबा रामदेव म्हणाले, ‘मी श्री सुशांत यांच्या कुटूंबाशी बोललो, जेव्हा मी त्यांची वेदना ऐकली तेव्हा माझा आत्माही थरथर कापू लागला, आम्ही सर्वजण पतंजलीमध्ये त्या दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करीत आहोत, आम्हाला सुशांत सिंग राजपूत आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवा.’

जर बदल्यांची चौकशी करायची असेल तर मग गेल्या 6 वर्षांत झालेल्या बदल्यांची व्हायला हवी’

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. त्या मृत्युच्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ५६ जणांचा जबाब नोंदवला आहे.बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी केलेली शिफारस केंद्राने मान्य केली. दरम्यान, रिया चक्रवर्ती हिने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालय 13 ऑगस्ट रोजी याबाबत निर्णय देईल. याशिवाय सुशांतच्या खात्यातून काढण्यात आलेल्या 15 कोटींबाबत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांकडून सतत विचारपूस करत आहे. आतापर्यंत ईडीने रियाचे भाऊ-वडील आणि सुशांतचे माजी व्यवस्थापकची देखील चौकशी केली आहे.

महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही महाराष्ट्र पोलीस उत्तमच – फडणवीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!