Shambhu Raje Desai । मुंबई : आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. हि बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली. यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांना स्थगिती देण्यापासून ते नवीन निर्णय जाहीर करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. तसेच गणपती उत्सव काळात राज्यभरात विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना दाखल छोट्या केसेस रद्द करण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी केलीय.
यानंतर पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यावेळी ते मंत्रिमंडळाची लिस्ट फायनल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात माजी मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत. पण त्याला कारण देखील तशीच आहेत. मागे एकदा तत्कालीन राष्ट्रपतींच्या निरोप समारंभावेळी ते गेले होते. शिवाय आणखी काही कामानिमित्त गेले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत. ते काही नेत्यांना भेटणार आहेत. यावेळी कदाचित मंत्रिमंडळ विस्तारावर होऊ शकतो. दोन चार दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. आम्ही सर्वस्वी अधिकार आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेले आहेत. कोणाला कोणतं खात द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सर्वस्वी ते ठरवतील, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath shinde | बुलडाण्यातील शेतकऱ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, केली ‘ही’ मागणी
- Cabinet meeting : शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान ते सवलत दरात वीज, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
- Deepak Kesarkar | शिवसेना पक्षप्रमुखपद उद्धव ठाकरे यांच्यासाठी रिक्त – दीपक केसरकर
- Pravin Darekar : त्याग काय असतो ते देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं : प्रवीण दरेकर
- Maharashtra Rain Update | राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस ; NDRF व SDRF च्या १४ तुकड्या तैनात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

