पिंपरी चिंचवड : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराबाबत भाजपचे नेते खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी निवेदन घेण्यास नकार दिला. या निवेदनाला नकार दिल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी महापालिकेतील स्मार्ट सिटी (Smart City) कंपनीतील कोट्यवधींचा घोटाळा, श्वान निबीर्जीकरणातील भ्रष्टाचारावर बोलावे, भाजपतील भ्रष्टाचाऱ्यांची ईडी (ED), इन्कमटॅक्स विभागामार्फत (IT) चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी भाजपच्या पिंपरी येथील पक्ष कार्यालयास भेट दिली. पक्ष पदाधिकारी, नगरसेवक यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप केले. दरम्यान, किरीट सोमय्या पिंपरीत येत असल्याची माहिती मिळताच शिवसैनिक मोठ्या संख्येने मोरवाडी येथील भाजप कार्यालयाबाहेर गोळा झाले. शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक अॅड.सचिन भोसले (Sachin Bhosale), शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे (Sulabha Ubhale) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे निश्चित झाले.
कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी किरीट सोमय्या यांची भेट घेत त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार, श्वान निबीर्जीकरणातील भ्रष्टाचार याविषयी अवगत करण्याचे ठरले. लेखी निवेदन आणि पुरावे तयार करण्यात आले. पोलिसांमार्फत निरोपही देण्यात आला. तथापि, शिवसेनेच्या शिष्टमंडळास भेट देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबजी केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या
- कंगनावर कोणताच कायदा लागू होत नाही, असं कसं?, ‘या’ अभिनेत्याचा संतप्त सवाल
- गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू; भाजप खासदाराचं खळबळजनक वक्तव्य
- महादेव जानकरांचा भाजपाला घरचा आहेर; म्हणाले,’आमचं सरकार असतानाही…
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

