टीम महाराष्ट्र देशा – काल बॉलिवूड गायिका कनिका कपूर हीला कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तीच्या संपर्कात आलेले भाजप खासदार दुष्यंतसिंह संसदेतही उपस्थित राहिल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कोरोनाची दहशत देशाच्या कायदेमंडळापर्यंत पोहोचली आहे.
लखनौ येथे मागील आठवड्यात रविवारी गायिका कनिकाने मेजवानी आयोजित केली होती. या पार्टीत बडे राजकीय नेते, सनदी अधिकारी उपस्थित होते. वसुंधरा राजे, लोकसभा खासदार दुष्यंतसिंह हेदेखील या पार्टीत सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान कणिकाला कोरोना झाल्याची माहिती मिळताच दुष्यंतसिंह त्वरित विलगीकरण कक्षात गेले आहेत. मात्र त्याआधी त्यांनी दोन दिवस संसदेत उपस्थिती लावली होती. संसद भवनात आणि सेन्ट्रल हॉल येथे दुष्यंतसिंह अन्य खासदारांना भेटले होते.
लोकसभेमध्ये दुष्यंतसिंह यांच्या शेजारी बसणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही चिंता व्यक्त करताना दुष्यंतसिंह स्वेच्छेने विलगीकरण कक्षात गेल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांची देखील दुष्यंतसिंह यांच्याशी भेट झाली होती. त्यामुळे तुमाने यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे.
Maharashtra: Shiv Sena MP Krupal Tumane went on self-quarantine after coming in contact with BJP MP Dushyant Singh during Parliamentary Standing Committee meeting on 18 March. Singh had attended a party which was attended by singer Kanika Kapoor who tested positive for #Covid_19.
— ANI (@ANI) March 21, 2020
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=vK5–X2kY2M
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

