🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत.
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी नाशिकमधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट घेतली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले नाशिक पूर्वचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची राऊत यांनी भेट घेतली.
तसेच सानप यांच्या समर्थनार्थ नाशिकमधील भाजपच्या तब्बल 14 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात युतीची डोकेदुखी वाढली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सानप यांची भेट घेतली आहे.
दरम्यान लोकसभा निवडणूक झालेल्या दारूण प्रभावामुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अस्थिरते वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विरोधी पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार हे जातीने मतदारसंघात लक्ष घालताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182557658542305280?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182555168824410112?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

