Share

भ्रमात राहू नका वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं होतं, सेनेचा भाजपला गर्भित इशारा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात मुख्यमंत्री पद कुणाला द्यायचं यावरुन भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी सुरु आहे. भाजपा आणि शिवसेनेत कोणीही माघार घेण्यास तयार नाही. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरेंच्या रुपाने आमदार असून आता त्यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरु आहेत. हे सर्व पाहता मुख्यमंत्री पद आमच्याकडेच राहील हे भाजपाने स्पष्ट केले.

यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला गर्भित इशारा दिला आहे. लक्षात ठेवा वाजपेयीचं सरकार एका मताने पडलं होतं. त्यामुळे जर कुणी म्हणत असेल की, माझ्याकडे १०० जागा आहेत आणि मी अल्पमतातील सरकार चालवू शकतो. तर ते चुकीचं आहे. कारण आपल्या देशात जी संसंदीय पद्धत आहे त्यामध्ये ही गोष्ट शक्य नाही.’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भाजपला एक गर्भित इशाराच दिला आहे.

‘जे ठरलं आहे तेच व्हायला पाहिजे. युतीला तडा जाईल ते आमच्याकडून घडणार नाही. उद्धव ठाकरे हे संयमी आणि सरळमार्गी नेते आहेत. त्यामुळे ५०-५० हा फॉर्म्युला लोकसभेलाच ठरला होता. पण मला आता कळत नाही की, अद्याप काय सुरु आहे. कारण याबाबत कोणतीही चर्चा सुरु झालेली नाही. मला माहिती आहे की, अमित शहा यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाली होती. अमित शहा हे प्रखर राम भक्त आहेत. राम सत्यवचनी आणि एकवचनी आहे. त्यामुळे ते योग्य तोच निर्णय घेतील. राज्यात निवडणुकीत युती होती. आता बहुमतही आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणेच व्हायला हवं.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला दिल्या वचनाची आठवण करुन दिली आहे.

आम्हाला १५ अपक्षांचे समर्थन मिळाले असून छोटे पक्ष आणि काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात होते. २०१४ पर्यंत संख्याबळाच्या आधारे मजबूत स्थिती असल्याचा संदेश शिवसेनेला देण्याचा प्रयत्न आहे. आमच्यासोबत १५ अपक्ष आमदार असल्याचे भाजपा प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी सांगितले. हे अपक्ष भाजपाचेच आहेत. ज्यांना युती आणि उमेदवारी न मिळाल्याने स्वतंत्र लढून जिंकले आहेत. २०१४ प्रमाणेच पार्टीकडे १२२ आमदार असल्याचे त्या म्हणाल्या.

तर, दुसरीकडे आता भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी राज्यात राजकीय भूकंप आणणारा खळबळजनक दावा केला आहे. ‘शिवसेनेचे ५६ पैकी ४५ आमदार हे आमच्या संपर्कात असून ते आम्हाला म्हणतायेत की, सरकार स्थापन करा आणि आम्हाला सत्तेत घ्या.’ असं काकडे झी २४ तास या वृत्तवाहिनीवरील चर्चेत म्हणाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1188038494150488064?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1188035354579750913?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1188033831556661253?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!