टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयाचं स्वागतच व्हावं, असे संजय राऊत यांनी म्हंटले. ते दिल्लीत बोलत होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काल ( बुधवारी ) कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसने मोतीलाल व्होरा यांना कॉंग्रेसचे हंगामी अध्यक्ष केले आहे.
दरम्यान राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले. राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयाचं स्वागतच व्हावं. वारंवार झालेल्या घराणेशाहीच्या आरोपामुळे राहुल गांधींना नाईलाजाने राजीनाम्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे राऊत यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर राहुल गांधीच्या निर्णयाचं पक्षासह पक्षाबाहेरील लोकांनी देखील स्वागत करायला हवं. राहुल गांधींनी मोठ्या मनाने अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे, असेही राऊत यांनी म्हंटले.


