Share

‘शरद पवार ती विधानं मुद्दाम करतात की, त्यांचे ते अज्ञान?’ चंद्रकांत पाटलांचा घणाघात

Published On: 

पुणे : राज्यात सद्या आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज नाराज असून राज्यभरात आक्रमक आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे धनगर समाज देखील आदिवासींप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी एकवटत आहे.

मराठा समाजासोबत अनेक लोकप्राधिनिधी देखील उभे राहिले असून प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे व खासदार उदयनराजे हे देखील प्रामुख्याने मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, काही लोक या दोन वशजांमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचे वातावरण निर्माण केले जात होते. त्यांना संभाजीराजेंनी चांगलेच फटकारले होते.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, ‘दोन्ही छत्रपती भाजपचे खासदार आहेत त्यामुळे त्यांनी केंद्रात जाऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवून घ्यावा’ असे वक्तव्य केले होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. ‘आरक्षण केंद्रातून मिळत नाही, हा त्या-त्या राज्याचा विषय असतो’ असे ते म्हणाले.

‘राजकारणात ५० वर्षे असणाऱ्या शरद पवार यांना माहिती कमी आहे असे मी म्हणणार नाही. पवार यांच्याविषयी माझ्या मनात नेगमीच आदर राहिला आहे, परंतु अधूनमधून ते जी विधाने करतात ती मुद्दाम करतात की, त्यांचे ते अज्ञान आहे हेच कळत नाही’ असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!