Share

‘तुझी उंची किती अन् तू बोलतो किती’ ; राणेंवर शिवसेना नेत्याची टीका

Published On: 

जालना: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली होती . ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती.

या अग्रलेखात शिवसेनेनं सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकेचे बाण सोडले होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे, असे त्यांनी म्हटले होते.

मात्र यावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत प्रतिप्रश्न केला होता. यावर त्यांनी म्हटलं होतं की, “स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही.

त्यावर प्रतिउउतर देताना शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांची खिल्ली उडवली आहे. यावर बोलताना खोतकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने यांना सर्व काही मिळाले असून यांचे नाव लौकिक झाले. असे उपरे लोकं खाल्या मिठाला न जागणारे असतात. त्यामुळे अशा लोकांना गद्दाराशिवाय दुसरी उपमाच आशु शकत नाही. तर तुझी उंची किती अन् तू बोलतो किती, असा खोचक टोलाही खोतकर यांनी निलेश राणेंना लगावला.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!