टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा अजब दावा केला आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दैवी शक्ती होती, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. औरंगाबाद महानगरपालिकीच्या सिद्धार्थ उद्यानातील वाघांच्या चार बछड्यांचा नामकरण सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
औरंगाबाद महानगरपालिकीच्या सिद्धार्थ उद्यानातील वाघांच्या चार बछड्यांचा नामकरण सोहळा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, दरम्यान, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दैवी शक्ती होती. असे ते म्हंटले.
इतकेच नव्हे तर, बाळासाहेबांचे व्याघ्रप्रेम अपार होते. मी वनमंत्री असताना बाळसाहेब यांना व्याघ्रप्रकल्प मध्ये घेऊन गेलो होतो. त्यावेळी पिंजऱ्यातील वाघांने बाळासाहेबांशी हात मिळवला होता. मी हे स्वत: पाहिले आहे. ही प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. त्यावेळी बाळासाहेबांकडे खरी आणि किती दैवी शक्ती होती हे आम्हाला पहायला मिळाली आहे. असे खैरे यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे, याआधीही चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन अत्यवस्थ असताना आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. नाहीतर, प्रमोद महाजन यांच्या नाडीवर भस्म लावून जप करून त्यांना वाचविले असते.असे वक्तव्य केले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

