🕒 1 min read
मुंबई- राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या आढळून आली आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातच आता शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कोरोना, अनलॉकसह इतर राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली होती. यात मुंबईतील आमदार सहभागी होणार होते. मात्र अनिल परब यांना कोरोना झाल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी सावध पावित्रा घेतला आहे. त्यांनी वर्षावर बोलवलेली आजची बैठक रद्द केली आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे या मंत्र्यांनाही करोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ आता परिवहन मंत्री अनिल परबही करोना पॉझिटिव्ह आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- ‘काँग्रेसची मंडळी केवळ राजकारणासाठी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत’
- मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन, प्रविण दरेकर-प्रसाद लाड पोलिसांच्या ताब्यात
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- ‘ऊर्जामंत्र्यांनी इतर राज्यात लक्ष देण्याऐवजी आपल्या खात्याच्या कारभारावर लक्ष देणे गरजेचे’
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
