Share

शिवसेना हा मोठा विश्वासघातकी पक्ष; भाजप नेत्याची शिवसेनेवर टीका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाविषयी वाद सुरु आहे. शिवसेनाला सत्तेत अर्धा हिस्सा पाहिजे तर भाजप समसमान वाटप करण्यास तयार नाही. अशातचं दोनही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता शिवसेनेवर टीका करताना “शिवसेना हा मोठा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यामुळे येत्या काळात मी आणि आमदार गीता जैन मिळून मीरा भाईंदरमधून शिवसेना मुळासकट संपवून टाकू असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मीरा भाईंदरमधून भाजपकडून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी मिळाली होती. परंतु येथे शिवसेनेकडून बंडखोरी झाली. गीता जैन यांनी बंडखोर करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे येथे आघाडीच्या उमेदवारासह तिरंगी लढत झाली. त्यात नरेंद्र मेहता यांचा पराभव झाला. मेहता शिवसेनेने निवडणुकीत मदत केली नसल्याचा मेहता यांचा आरोप आहे.

दरम्यान, सध्या राज्यात सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरु आहे. यात भाजप आणि शिवसेनेचे काही मुद्द्यांवर मतभेद आहेत. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. दोन्ही पक्षातील नेते मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1191934557068709889?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191928080891351040?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191919965252620288?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!