🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सातत्याने करण्यात आली आहे. आता राज्यात पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी असताना हि नामांतराची प्रक्रिया पूर्ण केली जाणार का असा सवाल उपस्थित केला असता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विषयावर भाष्य टाळले.
आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौर्यावर आहेत. मी आता शहराच्या विकास प्रश्नांवर बोलण्यासाठी आलोय, निवडणुका असतील तेव्हा राजकारणावर नक्कीच बोलेन असे म्हणत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे आणि मनसेच्या औरंगाबादचे संभाजीनगर करा या मागणीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.
औरंगाबाद शहरातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकार महापालिकेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलं तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील गेल्या महिन्यात शहरातील विकास कामांचा आढावा घेऊन सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, नव्हे ते आमचे कर्तव्यच आहे. त्यामुळे आज कुठल्याही राजकीय विषयावर मी बोलणार नाही असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.
शेंद्रा एमआयडीसीतील ऑरीक सिटीला भेट दिल्यानंतर लवकरच ऑरीक सिटी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन येथे देश-विदेशातील मोठे उद्योग येथील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ऑरीक सीटीमध्ये आतापर्यंत 53 उद्योगांसाठी जमिनी देण्यात आल्या आहेत, यापैकी अनेक उद्योग सुरूही झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली , तसेच येत्या काही वर्षात औरंगाबाद शहर औद्योगिक दृष्ट्या वेगाने प्रगती करेल असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
