Share

आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडणाऱ्या सचिन अहिरांना सेनेने दिली ‘ही’ जबाबदारी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन आहिर यांच्यावर शिवसेनेने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शरद पवार माझ्या हृदयात आहेत. माझा कोणावरही कुठल्याही प्रकारचा राग नाही परंतू आदित्य ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं सांगत त्यांनी सेनेमध्ये प्रवेश केला होता.

माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम कराल असा मला विश्वास आहे, अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

पाठिंबा आणि विश्वास दाखवल्याबद्दल आभारी आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या शुभेच्छांना सचिन अहिर यांनी ट्विटरद्वारे धन्यवाद दिले आहेत.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!