Share

शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Published On: 

मुंबई : शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई रंगणार आहे. दरम्यान काँग्रेस नेते राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत गावित हेच भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झाले आहे.

शिवसेनेने आज पालघर शहरात भाजपाला उत्तर देण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. भाजपचे खासदार चिंतामणराव वनगा यांचं निधन झाल्याने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. मात्र भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वनगा कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंतामणराव वनगा यांच्या मुलालाच भाजपकडून तिकीट मिळणार होतं, मात्र जे झालं तै दुर्दैवी आहे, असे स्पष्ट केले.

गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राजेंद्र गावित यांच्या नावाची शिफारस भाजपच्या संसदीय मंडळाला पाठवली आहे, त्यावर रात्रीपर्यंत निर्णय येईल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

दुसरीकडे शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजीचे वातावरण असून, शिवसेनेने असं करायला नको होतं. त्या जागेवर भाजपने विजय मिळवला होता. अशा शब्दात मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!