टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. जनतेने पुन्हा एकदा भाजप सरकारला निवडले असून देशाच्या प्रतिनिधित्वाची धुरा नरेंद्र मोदी यांच्या हातात दिली आहे. देशभरातून भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे सगळीकडे वातावरण हे मोदीमय झाले आहे. लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी एनडीए 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. तर त्या ३५० जागांमध्ये शिवसेनेचा देखील खारीचा वाट आहे. त्यामुळे यंदाच्या मोदींच्या मंत्रीमाडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपदाची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा युतीने जिंकल्या असून भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या आहेत. 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तर यावेळी इतर मंत्र्यांचेही शपथविधी होणार आहेत. त्यामुळे या शपथविधीला शिवसेनेच्या दोन कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यानी शपथ घ्यावी अशी अशा शिवसेनेने बाळगली आहे. 2014 मध्ये शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते.
तर कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेनेकडून कोणाला मंत्रीपद दिले जाणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अपेक्षित मंत्रिपदाचे दावेदार
- दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत
- यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

