Share

Shivsena | “सगळेच आनंद दिघे नसतात, तर काही…”; शिवसेनेचा एकनाथ शिंदेंवर हल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये तर दसरा मेळाव्यावरून सतत आरोप, टीकेबाजी सुरू असल्याचं दिसून येतं आहे. अशातच शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

एकनाथ शिंदे हे दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या नावाचा गैरवापर करत आहेत, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेनाच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Samana) रोखठोकमधून शिंदेंना लक्ष्य केलं आहे.

त्यामध्ये असं म्हटलं आहे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो. पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात.

तसेच, शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे (BJP) मोठे कारस्थान असल्याचंही त्यामध्ये म्हटलं गेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!