टीम महाराष्ट्र देशा : एकवीरा देवीचे दर्शन आणि अंबाबाईच्या दर्शनानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता २०१९ लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेले नवनिर्वाचित १८ खासदारांना घेऊन आयोध्येला जाणार असल्याचे वृत्त आले आहे.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने दणदणीत विजय मिळवला, भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या १८ नानिर्वाचीत खासदारांना येत्या १५ जून ला घेऊन आयोध्येला राम लल्लाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी एकवीरा देवीचे अंबाबाईचे दर्शन घेतले होते. आता ते पुन्हा एकदा आयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरेंचा यापूर्वीचा अयोध्या दौरा मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला होता आता उद्धव ठाकरे यांच्या याही दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

