🕒 1 min read
अलिबाग: भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya) आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोर्लई गावात पोहचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची १९ बंगले कोर्लई गावात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच्या शोधासाठीच ते तिथे पोहचले आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते बाईक आणि गाड्या घेऊन आले होते. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
दरम्यान याठिकाणी शिवसैनिकांनीही हजेरी लावत जोरदार घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्त्यांनी ‘किरीट सोमय्या आगे बढो’च्या घोषणा देत समर्थन केलं. तर काही शिवसैनिकांनी सोमय्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना पांगवले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या कड्यातच सोमय्या हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेले. आणि अवघ्या काही मिनिटांत सोमय्या बाहेरही आले. ते सरपंच प्रशांत मिसाळ यांना भेटले. मात्र मिसाळ यांनी सोमय्यांनी काहीच चर्चा केली नसल्याचे म्हटले.
दरम्यान किरीट सोमय्या निघून जाताच सोमय्या आले त्या जागेवर दूध आणि गोमूत्र शिंपडून शिवसैनिकांनी शुद्धीकरण केलं. यापूर्वीही शिवसैनिकांनी पुणे महापलिकेत गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होतं.
महत्वाच्या बातम्या:
- “किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाण्याचे कळताच संजय राऊतांचा थयथयाट सुरु झाला”, चंद्रकांत पाटलांनी सुनावले
- “…तो राजीनामा नव्हे, पक्षांतर्गत कारवाईच”, राहुल गांधींचे स्पष्टीकरण
- “…तर पाकिस्तानी पंतप्रधान तुम्हाला देहाती औरत म्हणाला नसता”, भातखळकरांचा मनमोहन सिंह यांच्यावर निशाणा
- बॅनर्सवर गडकिल्ल्यांची माहिती; मावळा प्रतिष्ठानकडून अनोखा उपक्रम
- IND vs WI: तिसऱ्या टी- २० सामन्यासाठी ईडन गार्डनवर असणार चाहत्यांची उपस्थिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
