Share

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर युती टिकून रहावी – आरएसएस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाविषयी वाद सुरु आहे. शिवसेनाला सत्तेत अर्धा हिस्सा पाहिजे तर भाजप समसमान वाटप करण्यास तयार नाही. दोनही पक्षाचे नेते यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.

भाजप-शिवसेना युतीवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर युती टिकून रहावी, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. अयोध्या प्रकरणी लवकरच निकाल येणार आहे. अशा स्थितीत सेना-भाजप एकत्र असणं गरजेचं असल्याचं संघाचं मत आहे अशी माहिती आहे.

दरम्यान, भाजप शिवसेना युतीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संघाच्या कार्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. परंतु या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं त्यामुळे भागवत आणि फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांच्या बैठकीनंतर भाजपने शिवसेनेशी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना चर्चा करणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1191928080891351040?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191919965252620288?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191916193340260354?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!