🕒 1 min read
राजौरी : क्राँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद(Gulab Nabi Azad) हे सध्या पुंछ आणि राजौरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बुधवारी(१ डिसें.)माध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी आपल्या पक्षाला एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये ३०० जागा जिंकेल असे आपल्याला वाटत नसल्याचे मत आझाद यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी बोलत असतांना आझाद म्हणाले की,’आपल्याकडे ३०० खासदार कधी असणार? त्यामुळे मी तुम्हाला (कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे) आश्वासन देऊ शकत नाही कारण काहीही झाले तरी त्यासाठी २०२४ मध्ये ३०० खासदार निवडून येणं गरजेचे आहे. देव करो आणि आपले ३०० खासदार निवडून येवोत. पण सध्याची परिस्थिती पाहता हे होईल असं वाटतं नाही. त्यामुळेच मी तुम्हाला खोटी आश्वासनं देत नाहीय आणि कलम ३७० बोलणं टाळतोय’, असे आझाद म्हणाले.
दरम्यान, आझाद यांच्या या वक्तव्यावरुन नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी टीका केली असून ते म्हणाले की,’सर्वोच्च न्यायालयाने हे (कलम ३७० चं) प्रकरण हाती घेण्यापूर्वीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पराभव स्वीकारला आहे.’
महत्वाच्या बातम्या
- एसटी महामंडळाचा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू
- सरकारचे ‘हे’ निर्बंध केंद्रीय आरोग्य विभागाने देशभरासाठी लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणारे
- औरंगाबादेत चक्क स्मशानभूमीतच केली बेकायदेशीर प्लॉटिंग!
- मी अनिल देशमुखांना कधी भेटलो ते मला आठवत नाही; सचिन वाझेची साक्ष
- ‘आदित्य ठाकरे माणुसकी जपा, आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
