नवी-दिल्ली : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आयसीएमआरचे साथीसंदर्भातील विभागाचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा(Samiran Panda) यांनी सध्या संपूर्ण जगावर भीतीचं सावट निर्माण करणारा कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन भारतातही दाखल झाला असल्याची शक्यता असून काही दिवसांमध्ये त्याचा शोध लागेल असे म्हंटले आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना पांडा म्हणाले की,’भारतात ओमायक्रॉन आढळल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या विषाणूची संक्रमणक्षमता पाहता काही दिवसात हे होण्याची शक्यता आहे.’तसेच पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने देशभरातील संबंधित प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले असून विषाणूची अनुवांशिक रचना निश्चित करण्यासाठी अभ्यास करत आहेत. यामुळे वेगवेगळ्या विषाणूंची ओळख पटवण्यात मदत मिळते. संसर्गास जबाबदार असलेले विषाणू ओळखण्यात ते तज्ज्ञ आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे कोरोनाला रोखण्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की,’जर तुम्ही कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला लागण होऊ शकते. मास्क, स्वच्छता, गर्दी टाळणं यामधून तुम्ही प्रतिबंध घालू शकता.’ तसेच लसीमुळे इतर आजार, रुग्णालयात जाण्याची वेळ, मृत्यू या गोष्टी टळू शकतात, मात्र संसर्ग रोखता येणार नाही, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- एसटी महामंडळाचा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू
- सरकारचे ‘हे’ निर्बंध केंद्रीय आरोग्य विभागाने देशभरासाठी लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणारे
- गुलाम नबी आझाद यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले,’२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला…’
- मी अनिल देशमुखांना कधी भेटलो ते मला आठवत नाही; सचिन वाझेची साक्ष
- ‘आदित्य ठाकरे माणुसकी जपा, आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

