टीम महाराष्ट्र देशा : मध्य प्रदेश भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आज चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आज सायंकाळी भाजप संसदिय पक्षाच्या बैठकीत नेता निवड झाल्यानंतर रात्री ९ वाजता त्यांचा शपथविधी झाला आहे.
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पंधरा दिवसांपासूनच डळमळीत झाले होते. काँग्रेसमधील ज्योतिरादित्य समर्थक २२ आमदारांनी आमदारकीचे राजीनामे दिल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात आलं.
सरकार वाचवण्यासाठी कमलनाथ यांनी काही प्रयत्न केले, मात्र ते य़शस्वी झाले नाहीत. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देवूनही ते सिद्ध न करता विधानसभा अध्यक्षांनी अधिवेशन संस्थगित गेले. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले, मात्र त्यांच्याकडे संख्याबळ जमले नाही. त्यामुळे तीन दिवसांपुर्वी त्यांनी राजीनामा दिला.
कमलनाथ सरकार कोसळल्यामुळे भाजप सरकार कधी स्थापन करणार आणि नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू असली तरी भाजपमध्ये शिवराजसिंह चौहान यांचे राजकीय वजन बघता पक्षासाठी निर्णय सोपा होता. चौहान यांनी शपथ घेतल्यानंतर आपली सर्वात पहिली प्राथमिकता ही कोरोनाशी लढाई असेल असेही म्हटलं आहे.
आप की शुभकामनाओं के लिए हृदय की गहराइयों से धन्यवाद।
मेरी सबसे पहली प्राथमिकता #COVIDー19 से मुक़ाबला है।
बाक़ी सब बाद में…
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 23, 2020
भोपाल स्थित राजभवन में आयोजित मुख्यमंत्री शपथ ग्रहण समारोह। https://t.co/CBzNlso4z7
— Office of Shivraj (@OfficeofSSC) March 23, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

