भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या पत्नी साधना सिंह आणि दोन्ही मुले कार्तिकेय आणि कुणाल सिंह चौहान यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता त्यांचा अहवालही आला आहे.
शिवराज सिंह चौहान पत्नी साधना सिंह आणि दोन्ही मुले कार्तिकेय आणि कुणाल सिंह चौहान यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, सुरक्षिततेचा भाग म्हणून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या कुटुंबीयांनी स्वतःला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले आहे.
दरम्यान, शिवराज सिंह चौहान याना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अनेक महत्वाच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचा अहवाल शिवराज सिंह यांचे मनोबल वाढवणाऱ्या आहेत. चाचण्यांच्या आलेल्या अहवालानुसार शिवराज सिंह यांना कोरोनाचा काही प्रमाणातच संसर्ग झाला आहे. त्यांच्या शरिरात कोरोना अधिक पसरलेला नाही. तरीही त्यांनी स्वताः त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले होते.
आज शिवराज सिंह यांनी ट्विट करत कोरोना वॉरियर्सची प्रशंसा केली आहे. एवढेच नाही, तर त्यांनी सर्वांनीच सहा फूट अंतर, हात वारंवार धूने आणि मास्क लावणे, हे कोरोनापासून बचावाचे सर्वोत्तम शस्त्र असल्याचे सांगितले आहे.
प्रिय प्रदेशवासियों, आपको #COVID19 से डरने की जरूरत नहीं है। लक्षण प्रकट होते ही टेस्ट कराएं और पॉजिटिव होने पर तत्काल इलाज शुरू करवाएं तो कोरोना पर विजय अवश्य मिलेगी।
इससे लड़ने का प्रमुख अस्त्र है, मास्क और दो गज की दूरी। इन अस्त्रों का प्रयोग अवश्य करें। #MPFightsCorona pic.twitter.com/Pyu2h6gAia
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 26, 2020
अखेर शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार; जाणून मंत्र्यांची संपूर्ण लिस्ट
‘भाजपमुळे नाही तर दिग्विजय सिंह यांच्यामुळे कॉंग्रेसचं कमलनाथ सरकार पडलं आहे’
‘छत्रपती शिवाजी महाराजां’चा असा अपमान शिवसेना सहन करणार का ? भाजपची कॉंग्रेस आणि सेनेवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

