टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेसबरोबर महाराष्ट्रात सत्तास्थापना करणाऱ्या शिवसेनाप्रणित सरकारला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंग चौहान यांनी टीका करत प्रश्न विचारले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद मध्य प्रदेशात आता चांगलाच पेटला आहे आणि त्याचे लोणं आता महाराष्ट्रातही येतील अशी चिन्ह आहे.
काँग्रेसच्या राज्यात शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, याची दखल महाराष्ट्रातलं शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार घेईल का? छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारं शिवसेना सरकार शिवरायांचा असा अपमान सहन करू शकेल का? असे सवाल भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता महाराष्ट्रातील राजकारण सुद्धा पेटणार अशी चिन्हं आहेत.
छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्र का गौरव हैं,हमारे आराध्य हैं व देश की प्रेरणा के स्रोत हैं।
उनका अपमान किसी भी कीमत पर सहन नहीं किया जायेगा।अगर आपत्ति थी तो उनकी प्रतिमा को सम्मानजनक तरीके से भी हटाया जा सकता था लेकिन यह सरकार तो महापुरुषों का अपमान करने में गर्व का अनुभव करती है। pic.twitter.com/7shlvhjLdq
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 12, 2020
मुख्यमंत्री कमलनाथ जी क्षमा याचना करें और छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को ससम्मान स्थापित करने की तत्काल व्यवस्था करें।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 12, 2020
महाराष्ट्र की शिवसेना सरकार जिसमें कांग्रेस भी शामिल है, छत्रपति शिवाजी महाराज को आदर्श मानती है। उनका ऐसा अपमान क्या वे सह पाएंगे?
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 12, 2020
नक्की काय घडलं –
मध्य प्रदेशात सौंसर नगरपालिकेनं ही पुतळा हटवण्याची कारवाई केली. सौंसर शहरातल्या एका चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून तरुणांकडून होत होती. त्यासाठी शहरातल्या एका युवा संघटनेनं शिवाजी महाराजांचा पुतळाही तयार केला होता.
चौकात एक दगडी चौथरा उभारून त्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. महाराजांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी स्थापित करण्यात आला होता. या चौथऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, असं कारण देत नगरपालिकेनं या पुतळ्याला परवानगी नाकारली.
दिवसा कारवाई केली तर लोकांचा रोष होईल. हे लक्षात घेत नगरपालिकेनं रातोरात हा पुतळा पाडण्याचा निर्णय घेतला. बुल्डोझर मागवून रात्रीच चौथरा उद्ध्वस्त करण्याची कारवाई करण्यात आली. हे लक्षात येताच लोक रस्त्यावर उतरले. छिंदवाडा -नागपूर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केलं. हा पुतळा पुन्हा तिथेच उभा करावा आणि लवकरात लवकर हे काम करावं अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान शिवराजसिंह चौहान यांनी केलेल्या ट्वीटमुळे महाराष्ट्रातही याविषयी चर्चा सुरू आहे. ‘शिवरायांना आदर्श मानणारं ठाकरे सरकार काँग्रेसला बरोबर घेऊन सत्तेत आहे. त्यांना शिवाजी महाराजांचा असा अपमान सहन कसा होतो’, असा तिखट सवाल शिवराज सिंह यांनी केला आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेसचं कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या प्रकाराची दखल घ्यावी आणि कमलनाथ यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी अशीही मागणी शिवराज सिंह यांनी केली आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

