Share

अखेर शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा झाला विस्तार; जाणून मंत्र्यांची संपूर्ण लिस्ट

Published On: 

भोपाळ : जगभरात कोरोना थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या कोरोनाच्या संकटात अनेक अडचणींवर मात करत अखेर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘कॅबिनेट’चा विस्तार केला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यावर चर्चाही सुरू होती. अखेर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कॅबिनेटचा विस्तार केला असून, आता 28 मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे आणि भाजपामधील त्यांचे समर्थक असलेल्या आमदारांना शिवराज मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘आज (2 जुलै) शपथ घेणार्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. मध्य प्रदेशातील प्रगती, विकास आणि कल्याणची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करू या. मला खात्री आहे की, राज्यात नवनिर्माण करण्यासाठी आपलं पूर्ण सहकार्य आणि योगदान मिळेल.

शिवराजसिंह चौहान नुकतेच नवी दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी अमित शाह, जेपी नड्डा यांच्या व्यतिरिक्त त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत घेतलेल्या काही तासांच्या बैठकीनंतर नव्या मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

‘हे’ आहेत शिवराज सिंह चौहानांच्या मंत्रिमंडळात : गोपाळ भार्गव, विजय शहा, जगदीश देवरा, बिसालाललाल, यशोधराज सिंधिया, भूपेंद्र सिंह, एडलसिंग कानशाना, ब्रिजेंद्र प्रताप सिंह, विश्वास सारंग, इम्रती देवी, प्रभूराम चौधरी, डॉ महेंद्रसिंग सिसोदिया, प्रद्युम्नसिंग तोमर, प्रेमसिंह बघेल, प्रेमसिंह पटेल, ओमप्रकाश सकलेचा, उषा ठाकूर, अरविंद्रसिंग भदोरिया, मोहन यादव भदोरिया, हरदीपसिंग शेण, राजवर्धनसिंग ओथ, भरतसिंग, इंदरसिंग परमार, राम खिलवान पटेल, राम किशोर कानवे, ब्रिजेंद्रसिंग यादव, गिरराज दंडौतिया, सुरेश धाकड, ओपीएस भदोरिया.

दरम्यान, मध्य प्रदेशचे विद्यमान राज्यपाल लालजी टंडन यांची प्रकृती खालावल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला, जेणेकरून घटनात्मक प्रक्रिया अखंडितपणे सुरू राहू शकेल. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराला काहीसा उशीर झाला.

सर्वात मोठी बातमी : अखेर बॉलीवूड मधील ‘या’ मोठ्या स्टार्सविरोधात तक्रार दाखल

‘उद्धव ठाकरे एक नंबर काम करत आहेत, म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय’

मोठी बातमी : कोरोना टेस्ट साठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!