Share

मामांनी लढाई जिंकली, शिवराज सिंह चौहान यांची कोरोनावर मात

Published On: 

भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोविड सेंटर रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

कोविड नियमावलीनुसार पुढील सात दिवस शिवराज सिंह घरातच सर्व खबरदारी घेऊन राहणार आहेत. त्याचबरोबर त्यांची नियमित आरोग्य चाचणीही करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची 25 जुलै रोजी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना कोविड सेंटर चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयानुसार शिवराज सिंह यांना तीन दिवसांपासून ताप आलेला नाही तसेच इतर क्लीनिकल टेस्टही नॉर्मल आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: निकलांमध्ये असलेल्या त्रुटींसंदर्भात अभाविपचे कुलगुरूंना निवेदन

दुसरीकडे देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. देशात या जीवघेण्या विषाणूमुळे ४० हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत म्हणजेच बुधवारी सकाळी ८ ते ८ या काळात देशभरात कोरोना विषाणूमुळे ९०४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे ४० हजार ६९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना विषाणूच्या नव्या रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दररोज ५० हजाराहून अधिक कोरोनाचे नवे रूग्ण आढळून येत आहेत यामुळे कोरोना रुग्णांचा आलेख दररोज वाढता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात २४ तासांत कोरोना विषाणूची लागण झालेल्या ५६ हजार २८२ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यामुळे आतापर्यंत १९ लाख ६४ हजार ५३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

प्रभू श्री रामाच्या मंदिराचा शुभारंभ तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण – जयंत पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!