पुणे: यंदा कोरोना महामारीच्या थैमानामुळे अनेक क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. उद्योग, व्यवसायांसह देशाचे भवितव्य भक्कम करणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रावर देखील याचे परिणाम झाले असून राज्यातील विद्यापीठांमध्ये एप्रिल, मे मधील उन्हाळी सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आला होता. तर, राज्य सरकार व केंद्राच्या युजीसी समितीमध्ये अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात अजूनही मतभेद असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमासह चिंतेचे वातावरण कायम आहे.
तर, गेल्या काही दिवसांमध्ये अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांचे निकाल विद्यापीठांतर्फे लावण्यात आले आहेत. परंतु विधी व अभियंत्रिकी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी व चुकीच्या पद्धतीने निकाल लावले गेल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. यासंदर्भात, विद्यार्थ्यांनी अभाविपकडे विद्यापीठाच्या या कारभाराबाबत तक्रार केली असता, अभाविप पुणे जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेतली.
वाह रे पठ्यांनो !भाजपच्या नेत्यांनी मटणावर ताव मारून केले श्रीराम पूजन;जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या
यावेळी, विद्यापीठातर्फे लावण्यात आलेल्या निकालांमधील त्रुटींमुळे कोरोना सारख्या संकटकाळात विद्यार्थ्यांना अधिक मानसिक त्रास सहन करावा लागत असून शैक्षणिक भवितव्याबाबत निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेता या त्रुटी दूर करून निकाल पुन्हा लावण्यात यावा. तसेच, विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकणासाठी अर्ज भरण्याची मुभा द्यावी, कोरोना महामारीच्या काळात सर्वांनाच आर्थिक फटका बसला असून, महाविद्यालयांचे शुल्क भरण्यास मुभा देण्यात यावी व महाविद्यालयीन शुल्क ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यावे. तसेच, ४ ते ५ टप्प्यात शुल्क भरण्यास सवलत द्यावी.

सांगलीत महापुराची भीती, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ
या सत्रातील परीक्षा रद्द करण्यात आलेल्या वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तात्काळ विद्यार्थ्यांना परत करावे. सर्व विद्यार्थी समस्यांवर समर्पक चर्चा करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी प्रमुख मागणी अभाविपतर्फे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत, पुणे जिल्हा संयोजक गौरव वाळुंजकर, सम्यक साबळे, प्रबल मल्होत्रा, शोनक विशाल यांनी केली असून कुलगुरूंना निवेदन देऊन चर्चा देखील करण्यात आली. यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिल्याचे समजते.
आनंदाची बातमी : लसीचा पुरवठा करण्यासाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेकचा सिरम सोबत करार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

