मुंबई – प्रभू श्री रामाच्या मंदिराचा शुभारंभ क्षण हा तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम हे कायमच भारतीयांचे दैवत राहतील असे ट्वीट करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काल अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदीराचा भूमीपूजन सोहळा पार पडत आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांनी त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघात बांधलेल्या राम मंदिराचा फोटो ट्विट करत आम्ही नेहमीच प्रभू श्री रामाची भक्तीभावे पूजा करतो असे स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण राम आपल्या सगळ्यांच्या मनात!: पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘आपली मुंबई सुरक्षितच आहे’, नाव न घेता सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
