Share

भाषा शैली नीट वापरा,संजय राऊत यांना शिवेंद्रराजेंचा निर्वाणीचा इशारा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केलेल्या पुस्तकावरुन त्यांच्या वंशजावर केलेल्या टीकेनंतर आता संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तर राऊत यांना सज्जड दम दिला आहे.

आम्ही राजघराण्यात जन्मलो याचे नेमके काय पुरावे द्यायचे? असा सवाल केला आहे. ‘अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही कोणत्या घराण्यात जन्माला आलो आहोत त्यांना कोणता पुरावा पाहिजे तो त्यांनी सांगावा आणि संजय राऊत यांनी भाषा शैली नीट वापरावी, असा इशाराही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. हा वाद त्यांनी सुरु केला आहे, आता तो संपवायचा कसा हे त्यांनीच बघावं, असंही शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

या देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू द्या. ते माजी खासदार आहेत. भाजपाचे नेतेही आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. मात्र एखादा महापुरुष हा सर्वांचा असतो. गणपती, विष्णू अशा दैवतांची पूजा करताना कुणी विचारायला जात नाही. तसेच महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आहे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील. तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे.असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.

दरम्यान,या आधी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन भाजपवर चौफेर टीका सुरु आहे. मात्र यात आता वंशजावर टीका करणारे संजय राऊत चांगलेचं वादात सापडले आहेत. भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेचं या पुस्तकाविरोधात महाराष्ट्रातील जनता बोलतं आहे. त्यामुळे छत्रपतींच्या गादीच्या वारसदारांनी या विषयावर बोललंच पाहिजे असं मतं संजय राऊत देखील त्यांनी व्यक्त केलं होतं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!