औरंगाबाद : निष्ठावान राहिल्यास पक्षाचे संघटन आणखी मजबूत होते. शिवसेना पक्षाने हातावर बांधलेले शिवबंधन हाच जनतेचा विश्वास असून शिवसैनिकांनी या विश्वासाला तडा जाईल असे वागू नये. हा विश्वास कायम ठेवावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने कन्नड तालुक्यातील बहिरगाव (चिखलठाण) येथे रविवारी (दि.१) आढावा बैठकीत केले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ ते १ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात शिवसंपर्क मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा समारोप कन्नड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातील देवगाव रंगारी येथे झाला. आ. अंबादास दानवे यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या बहिरगाव, चापानेर, औराळा, देवगाव रंगारी याठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय बैठका घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी संघटनात्मक पक्षबांधणी, बुथ रचना, बुथप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख यांच्या नियुक्त्या, पदाधिकारी यांच्या अडीअडचणी याविषयी आढावा घेतला.
पुढे बोलतांना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची सर्वात अगोदर कर्जमाफी करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोविडच्या काळात धैर्याने परिस्तिथी हाताळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनल्याचा अभिमान प्रत्येक शिवसैनिकाने बाळगला पाहिजे. शिवसेनेच्या विरोधातही अनेकजण असतांना शिवसैनिकांनी मात्र प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. आणि या प्रामाणिकतेवर शिवसेना आज उभी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उपांत्य फेरीतील पराभवानंतर सिंधू नाराज झालेली पण… ; सिंधूच्या आईने सांगितले रहस्य
- पुणे शहरात आज ३३३ रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची भर !
- ‘विमा कंपन्यांवर कडक कारवाई करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- सर्व जातीधर्मांच्या लोकांना काँग्रेस कमिटी मध्ये स्थान द्या-बाळासाहेब थोरात
- ‘थापड झापडची भाषा मुख्यमंत्र्यांनी करणे दुर्दैवी’ – दरेकर

