Share

अभिनेत्रीच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून शिवम पाटीलने केली पोलिसात तक्रार

Published On: 

मुंबई : मराठमोळा अभिनेता शिवम पाटील छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शोमधून पुढे आला आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने ‘अय्यारी’ या सिनेमात शिवमने अगदी छोटीशी पण दमदार भूमिका साकारली होती. तसेच ‘घायल-वन्स अगेन’ आणि ‘कालाकांडी’ या सिनेमातही त्याने भूमिका गेल्या काही वर्षांपासून शिवम बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न करत आहे, मात्र काही कारणांमुळे त्याला प्रचंड अडचणी आल्या. काही आरोपामुळे त्याला मानसिक आणि शारिरीक त्रासला सामोरी जावे लागले, याच बाबत त्याने सोशल मिडियावर खुलासा केला आहे.

https://www.instagram.com/p/CPc2iJAFuK5/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री मेधा शंकर आणि अन्य दोन महिलांनी लावलेल्या आरोपांमुळे शिवमला काम मिळेनासे झाले आणि त्याच्या पुढे संकट निर्माण झाले. आता सोशल मीडियावर त्याने या सगळ्या आरोपांना उत्तर दिले आहे. या आरोपांमुळे नैराश्यात गेल्याचे त्याने म्हटले आहे. सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत तो लिहितो की, मेधा सतत माझा अपमान करायची. माझ्या शरीरयष्टीवर विनोद करायची. तिने अनेकदा माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले आहे. मी त्रस्त होतो. पण तिच्याबाबत मी कोणाकडे तक्रारही केली  नाही. कारण मला माझे करिअर संपण्याची भीती वाटत होती. ती भीती मेधानच माझ्या मनात निर्माण केली होती’.

तर पुढे तो म्हणतो की, एकेदिवस या त्रासातून मुक्त होण्याचा निर्णय मी घेतला. तिच्या पासून वेगळं झालो पण तरी देखील ती त्रास देत राहिली’मी आमच्या नात्याविषयी बाहेर कुठेही काही बोललो, तक्रार केली तर माझे करिअर संपवण्याची अप्रत्यक्ष धमकीच तिने मला दिली होती. गेली दोन वर्ष मी नैराश्येत होतो. आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या मनात अनेकदा येऊन गेला’, असे त्याने या पोस्टमध्ये लिहीत मोठा खुलासा केला आहे. अखेर शिवमने या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे कायदेशीररित्या तक्रार देखील दाखल केली आहे. या पोस्टमध्ये त्याने रिलेशनशिपबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!