मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती अनावधानाने प्रसिद्ध झाली अशी कबुली शिवसेनेकडून देण्यात आली आहे. आढळराव पाटील हे शिवसेनेतच कार्यरत आहेत असेही सांगण्यात आले आहे. शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी केल्याने यामध्ये शिवसेनेचे मोठे नुकसान मानले जात होते परंतु त्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले होते.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात लिहिले आहे की, ३ जुलै २०२२ रोजी सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात आलेली होती. या सर्व बाबींवर आता आढळराव पाटील यांनी सवाल उपस्थिती केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाची पोस्ट टाकली म्हणून माझी थेट हकालपट्टी केली. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बातमीही प्रकाशित झाली आणि नंतर आमच्याकडून चुकीनं हकालपट्टीची बातमी प्रकाशित झाल्याचं सांगण्यात आलं. चुकीनं हकालपट्टी होण्याएवढा मी छोटा माणूस आहे का ? असा प्रश्न आढळरावांनी उपस्थिती केला आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र पाठवले. मात्र तुमच्या हकालपट्टीचा प्रश्न येतोच कुठेय, मीच राजीनामा दिलाय. तुम्ही आणखी किती लोकांची हकालपट्टी करणार, असा थेट सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. तसेच आज माध्यमांशी बोलताना कदम यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
महत्वाच्या बातम्या :
- VIDEO | “साजना तुझ्याविणा सुणे…”; ‘केसरीया’चं मराठी व्हर्जन ऐकलं का?
- Devendra Fadnavis :पूरातील शेवटच्या माणसाचा बचाव होईपर्यंत बचावकार्य सुरू राहणार – देवेंद्र फडणवीस
- Sanjay Raut | “महाराष्ट्रातील जनता पुरात मात्र मुख्यमंत्री शिंदे सरकारला वाचवण्यासाठी दिल्लीत” ; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
- Ramdas Kadam : पक्ष संपला तरी चालेल, पण उद्धव ठाकरे पवारांसोबतच आहेत, हे का होतंय?; रामदास कदमांचा सवाल
- Sanjay Raut : लढाई कोणतीही असू द्या, आम्ही दोन हात करायला तयार – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

