Share

शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांनी सर्व नियम तोडून कुटुंबासह घेतली कोरोनाची लस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, ठाणे या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. मुंबईमध्ये सध्या ६९०० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर ठाण्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६५५२ वर पोहोचली आहे.

ही सर्व चिंताजनक परिस्थिती असतानाच दुसरीकडे कोरोनाचे लसीकरण चालू आहे. परंतु या लसीकरणासाठी सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत. या लसीकरणासाठी शासनाने प्राधान्यक्रम ठरवला आहे. पण हे सर्व नियम तोडून शिवसेनेचे ठाण्याचे महापौर आणि आमदार रवी फाटक व त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोनाची लस घेतली असल्याचा प्रकार समोर येत आहे.

या संदर्भात भाजपचे नेते अतुल भातकळकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून एक व्हिडीओ प्रसिद्ध केलेला आहे. त्या व्हिडीओमधून त्यांनी शिवसेनेचे ठाण्याचे महापौर आणि आमदार रवी फाटक यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील सडकून टीका केलेली आहे.

‘गोरगरीब, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक गरजूंना मागे सारून, शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून शिवसेनेचे ठाण्याचे महापौर आणि आमदार रवी फाटक व त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोनाची लस घेतली. रांगेतली ही घुसखोरी शिवसेनेची आपमतलबी राजकीय संस्कृती दाखवणारी घटना आहे.’ अशा आशयाचे ट्वीट करून भातकळकर यांनी त्यांचा संताप व्यक्त केलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!