🕒 1 min read
मुंबई : मर्सिडीज बेंझ या कार निर्मिती कंपनीने 1994 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश केला होता. यावेळी कंपनीच मुख्यालय पुण्यात तर 1996 मध्ये बंगळुरू येथे संशोधन आणि विकास केंद्र स्थापन केले होते. त्यांनतर आता मर्सिडीज बेंझ इंडियाने नोव्हेंबरमध्ये स्थानिक पातळीवर असेंबल केलेली गाडी GLC 43 एएमजी कूप तर आता लोकल लेव्हलवर असेंबल केलेली कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. A35 AMG असं या कारचं नाव असेल. पुढील महिन्यात लाँच होणारी ही कार मर्सिडीज बेंझ ए-क्लास लिमोझिनवर आधारित असेल
GLC 43 एएमजी कूप या कारची किंमत 76.70 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. मॉडेलमध्ये 2.0 लिटर, फोर सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 301bhp आणि 400Nm टॉर्क निर्माण करेल. हे इंजिन 7-स्पीड डीसीटी स्वयंचलित ट्रांसमिशनशी जोडले जाईल. यात 4 Matic सिस्टिमच्या मदतीने चारही चाकांना एनर्जी दिली जाते. हे मॉडेल अवघ्या 4.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास इतका वेग घेऊ शकतं. इलेक्ट्रॉनिकली या कारचा कमाल वेग 250 किमी प्रतितास इतका आहे.
आगामी मर्सिडीज-बेंझ A 35 AMG व्हिज्युअल अपडेटमध्ये ए-क्लास लिमोझिनपेक्षा थोडी वेगळी वाटते. त्यामध्ये नवीन सिंगल-स्लेट ग्रिल, रीडिझाइन फ्रंट आणि रीअर बम्पर, रीअर डिफ्यूझर आणि ड्युअल क्रोम टेल-पाईपचा समावेश आहे. या मॉडेलला AMG परफॉर्मन्स सीट्स, एएमएस स्पेक स्टीयरिंग व्हील, एमबीयूएक्स कनेक्टिव्हिटी आणि एक टचपॅड मिळेल. हे मॉडेल एएमजी परफॉर्मन्स सीट्स, AMS स्पेक स्टीयरिंग व्हील, MBUX कनेक्टिव्हिटी आणि टचपॅडसह सुसज्ज असेल.
भारतात मर्सिडीज-बेंझचा विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओ आहे. भारत आता कंपनीसाठी मोठी बाजारपेठ आहे. मर्सिडीज बेंझच्या बर्याच मोटारी भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कंपनीने भारतात आतापर्यंत एकूण 14 मॉडेल्स लाँच केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
