Share

राजदंड पळविणे हा शिवसेनेचा ‘स्टंट’ – विखे पाटील

Published On: 

नागपूर – नाणार प्रकल्पावरून राजदंड पळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न म्हणजे निव्वळ ‘स्टंट’ होता. या प्रकल्पाला तोंडदेखला विरोध करून शिवसेना कोकणातील जनतेचा विश्वासघात करते आहे. शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

बुधवारी विधानसभेत घडलेल्या प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी शिवसेनेच्या विश्वासार्हतेवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, मंगळवारी विधान परिषदेत नाणारचा मुद्दा उपस्थित झाला असता शिवसेना मूग गिळून बसली होती. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे सांगून त्यांचे उद्योगमंत्रीही गप्प बसलेले होते. या दुटप्पी भूमिकेसाठी वर्तमानपत्रांनी झोडून काढल्यानंतर शिवसेनेला दुसऱ्या दिवशी खडबडून जाग आली आणि म्हणून ‘डॅमेज कंट्रोल’साठी त्यांना राजदंड पळविण्याची नौटंकी करावी लागली. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नुकताच नाणार प्रकल्पाविरोधात मोर्चा काढला होता.

त्या मोर्चात शिवसेनेने “आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर… भाजप सरकार जमीनचोर…”, “एक दो एक दो… भाजप सरकार फेक दो…” अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र याच घोषणा सभागृहात देण्याची हिंमत शिवसेनेने दाखवली नाही. रस्त्यावर एक अन् विधीमंडळात वेगळीच भूमिका मांडून शिवसेना कोकणवासियांची शुद्ध फसवणूक करीत असल्याचा घणाघात विखे पाटील यांनी केला.

‘एकत्र नांदता येत नसेल तर वेगळे व्हा.’- शरद पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!