मुंबई : आर्यन खानच्या अटकेवरून बॉलीवूडच नाही तर राजकारणात सुद्धा चर्चेला उधाण आले आहे. राजकारणात आर्यन खानच्या सुटकेसाठी अनेक नेत्यांनी प्रार्थना केली आहे. काल आर्यन खानच्या सुटकेसाठी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही किशोर तिवारी यांनी केली.
एनसीबीने मूलभूत हक्कांचा भंग केला आहे. आर्यनचे मूलभूत अधिकार गोठवून ठेवले आहेत. असा आरोप सुद्धा तिवारी यांनी केला आहे. दरम्यान याच मुद्यावरून माजी राज्यमंत्री आणि विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले ‘आर्यन खान कडून मलीदा भेटतो आहे म्हणून शिवसेनेची न्यायालयात धाव पण, मावळमधील गोळीबारात शेतकऱ्यांच्या रक्ताचा चिखल झालेल्या हुतात्मासाठी न्यायालयात गेली का शिवसेना कधी ? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
आर्यखान कडून मलीदा भेटतो आहे, म्हणून शिवसेनेची न्यायालयात धाव..
.
पण मावळमधील गोळीबारात शेतकऱ्यांच्या रक्ताचा चिखल झालेल्या हुतात्मासाठी न्यायालयात गेली का शिवसेना कधी ?— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) October 20, 2021
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड महापालिकेस पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्यास मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी भारतीय किसान मोर्चातर्फे काढलेल्या मोर्चात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मावळ घटनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘जाऊ तिथं खाऊ, चोर चोर मावसभाऊ व निम्म निम्म वाटून खाऊ असे हे महाखाऊ’, सदाभाऊंचा हल्लाबोल
- ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दिवाळीत काळे झेंडे दाखवून स्वागत करा’, राजू शेट्टींचे आवाहन
- भारतीय सैन्याकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा
- नाना पटोले यांच्यावर नाराजी, सचिन सावंतांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा तडकाफडकी राजीनामा
- राहुल गांधी ‘ड्रग्ज अॅडिक्ट’; भाजपाने वक्तव्याची तत्काळ माफी मागावी – काँग्रेस

