Share

राहुल गांधी ‘ड्रग्ज अॅडिक्ट’; भाजपाने वक्तव्याची तत्काळ माफी मागावी – काँग्रेस

Published On: 

बंगळुरू : कर्नाटकात ३० ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन जागांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यान कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राहुल गांधी यांना अंमली पदार्थांचे व्यसन करणारी व्यक्ती असे संबोधले आहे. तसेच ते ड्रग्सची तस्करी करत असल्याचा खळबळजनक दावाही केला आहे. आता याप्रकरणी भाजपने तत्काळ माफी मागावी, अशी मागणी कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी केली आहे.

याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी ट्विट केले होते. ‘राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही आहे. राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन असून ते ड्रग्ज तस्करदेखील आहेत. हे मीडियात आलं होतं. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही,’ असं नलीन कुमार कटील म्हणाले होते.

नलीन कुमार यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेसनं हा मुद्दा उचलून धरला आहे. कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी भाजप नेत्याच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसंच नलीन कुमार यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी ट्विटद्वारे केली केली.

आपलं राजकारण हे विरोधकांसाठीही सभ्य आणि सन्मानजनक असायला हवं, असं मला वाटतं. मला आशा आहे की भाजपही माझ्या या मताशी सहमत असेल भाजपाने राहुल गांधींबद्दल केलेल्या या अपमानजनक टिप्पणीबद्दल माफी मागतील, असे ट्विट शिवकुमार यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!