Share

‘जाऊ तिथं खाऊ, चोर चोर मावसभाऊ व निम्म निम्म वाटून खाऊ असे हे महाखाऊ’, सदाभाऊंचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील भरतीच्या परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच आहे. विविध पदांसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. यात वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, विविध संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी, एकाच वेळेत ठेवण्यात आली आहे. शिवाय अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आली आहेत. त्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळ संपत नसल्याचे चित्र आहे. यामुळे आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापाताना दिसत आहे. विरोधी पक्ष भाजपाकडून ठाकरे सरकार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली जात आहे. परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात आला आहे.

याच मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘२४ ऑक्टोंबरला परीक्षा आयोजित करून या परीक्षेच्या नियोजनातही आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजन अजूनही दिसून येत आहे. मला वाटतं की यांनी ठरवलं आहे, की जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ आणि अर्ध अर्ध वाटून खाऊ अस हे महाखाऊ सरकार आहे.’ अशी टीका त्यांनी केली आहे.

तर ‘एक दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर, दोन्ही काही मैलावर. ‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’- आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेत दुसऱ्यांदा गोंधळ झालाय. थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा. नसेल तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावा’ अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!