🕒 1 min read
औरंगाबाद : बाबासाहेब मनोहरे उद्या (दि.२२) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओ पदी रुजू होत आहेत. मात्र रुजू होण्यापूर्वीच त्यांच्या येण्यावरून शहरात मोठे वादंग माजले आहे. मनोहरे एकीकडेच राहिले आणि त्यांच्या येण्यावरून शिवसेनेतील मोठी दुफळी मात्र समोर आली आहे. मनोहरे यांच्या समर्थनार्थ आमदार संजय शिरसाठ तर त्यांचा विरोधात माजी खासदार चंद्रकांत खैरे मैदानात उतरले आहेत.
‘स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांना बसूच देणार नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना औरंगाबाद स्मार्ट सिटीस आयएएस दर्जाचा अधिकारी द्यावा अशी मागणी केली आहे’, अशी माहिती शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला काल दिली होती.
‘कुणाला जॉइन करुन घेणे न घेणे हा सरकारचा अधिकार आहे. जर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारने बाबासाहेब मनोहरे यांची स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओ पदी नियुक्ती केली असेल तर तो निर्णय शासनाने विचार करूनच घेतला असेल. त्यांना चार्ज द्यायलाच हवा’. अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना आज दिली.
खैरे आणि शिरसाठ दोघेही औरंगाबाद शहरातील शिवसेनेत महत्त्वाचे स्थान भूषवतात. मात्र मनोहरे प्रकरणात दोघांच्याही प्रतिक्रिया परस्पर विरोधी असल्याने या प्रकरणावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा !
- …तर पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- परभणीकर संघर्ष समितीचे ‘एसएमएस’ आंदोलन
- ‘राहुल गांधींना ‘हम दो, हमारे दो’ म्हणण्यासाठी आधी लग्न करावं लागेल’
- हे का बंद ? हे का उघडे ? असले राजकारण करणे आता सोडून द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
