Share

परभणीकर संघर्ष समितीचे ‘एसएमएस’ आंदोलन

Published On: 

परभणी : परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना एसएमएस पाठवण्याचे आंदोलन परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. या संबंधी पत्रक काढत तीघांचेही मोबाईल नंबर समितीने जाहीर केले आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबतचे एसएमएस पाठवण्याचे हे आवाहन माजी आमदार विजय गव्हाणे, संयोजक खासदार फौजीया खान यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. आता हा विषय राज्यमंत्री यांनी कॅबीनेट मंत्र्यांसमोर मांडून या वर शिक्कामोर्तब करण्याची गरज आहे. कोरोनामुळे आंदोलन न करता परभणी संघर्ष समिती सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५. ३० या वेळी एसएमएस पाठवून भावना व्यक्त करणार आहे.

परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या साठी शिवसेनेचे आमदार डॉ. राहूल पाटील तर खासदार संजय (बंडू) जाधव यांनी देखील सुरुवातीला या विषयात लक्ष घातले. तर आता आमदार तसेच खासदार देखील या मध्ये विशेष लक्ष घालताना दिसत नाहीत. या मध्ये राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार फौजीया खान, माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे हे सातत्याने लक्ष ठेवून आहेत. तसेच स्व:त ची भूमिका देखील मांडत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!