Share

जपानच्या पंतप्रधानांना मोदींनी दिली ‘ही’ खास भेट

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीसाठी भारतात आलेल्या जपानच्या पंतप्रधानांना खास भेट दिली आहे. ही भेट म्हणजे ‘कृष्णपंखी’. शनिवारी (19 मार्च) मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना ‘कृष्णा पंखी’ भेट दिली. विशेष म्हणजे ती चंदनापासून बनवली जाते. यासोबतच भगवान श्रीकृष्णाच्या विविध मुद्रा त्याच्या बाजूने कलात्मक आकृत्यांमधून दाखवण्यात आल्या आहेत.

हे ‘पंख’ पारंपारिक साधनांचा वापर करून कोरले गेले आहे, तसेच त्याच्या वरच्या भागात भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची हाताने कोरलेली आकृती आहे. ही ‘कृष्णपंखी’ राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील कुशल कारागिरांनी बनवली असून शुद्ध चंदनाच्या लाकडापासून बनलेली आहे, जी प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेकडील जंगलात आढळते. जपानचे पंतप्रधान १४व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारत दौऱ्यावर आहेत

जपानने भारतात 3.2 लाख कोटी गुंतवणार
किशिदा यांनी युक्रेन संकटासह इतर मुद्द्यांवर मोदींसोबत व्यापक चर्चा केली. नंतर, पुढील पाच वर्षांत भारतात पाच ट्रिलियन येन (रु. 3,20,000 कोटी) गुंतवणुकीचे उद्दिष्ट जाहीर केले. ही घोषणा 2014 च्या गुंतवणूक प्रोत्साहन भागीदारीचा भाग आहे. त्यावेळी दोन्ही देशांनी 2014 ते 2019 पर्यंत 3.5 ट्रिलियन येनच्या जपानी गुंतवणुकीवर सहमती दर्शवली होती. स्वतंत्र स्वच्छ ऊर्जेची भागीदारी मजबूत करण्यासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, मोदी म्हणाले, “भारत-जपान भागीदारी अधिक दृढ करणे केवळ दोन्ही देशांसाठीच महत्त्वाचे नाही, तर ते इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, समृद्धी आणि स्थिरता आणेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!