Share

पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव ; नारायण राणे

Published On: 

मुंबई : कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव आहे असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायन राणे यांनी केला आहे. राणे यांनी शिवसेनेवर टीका करत म्हटले,रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार ग्रीन रिफायनरीला हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेने घातला असून कोकण भस्मसात करण्याचा डाव सेनेचा असल्याचाही आरोप राणेंनी केला.

काय म्हणाले नारायण राणे?

कोकणासंदर्भात शिवसेनेची भूमिका कायमच दुटप्पी राहिली आहे. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा डाव शिवसेनेचा आहे. आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांनी दम दिल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करु. काही झालं तरी कोकणवासीयांचा ऱ्हास करणारा प्रकल्प मी होऊ देणार नाही. मी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊनच जाणार आहे. मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहिती आहे.

“आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांनी दम दिल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करु. काही झालं तरी कोकणवासीयांचा ऱ्हास करणारा प्रकल्प मी होऊ देणार नाही. मी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊनच जाणार आहे. मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहिती आहे.” तसेच १८ गावातील जनतेचा, शेतकऱ्यांचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध आहे. कोकणात एकूण 13 हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. या भागात 7 लाख आंब्यांची झाडं आणि 2 लाख काजूची झाडं आहेत, जगातला प्रसिद्ध देवगड आंबाही याच क्षेत्रातला आहे,

राज्याचे ‘उद्योगी’ मंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचेच आहेत. उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला?, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली? “विरोध करणाऱ्या अशोक वालम यांना धमक्या दिल्या जात आहेत. सात पिढ्या बसून खाईल इतके पैसे मिळतील, असं पत्र वालम यांना देण्यात आलं. त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या, छळ केला. वालम यांना ‘मातोश्री’वर बोलवून दम दिला जातो आहे.“,शिवसेनेचे पदाधिकारी दलाली करत आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्याची माहिती आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!