टीम महाराष्ट्र देशा : महाविकासआघाडी अर्थात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा बहुचर्चेत असलेला मंत्रिमंडळ विस्तार काल (सोमवारी) झाला. मुंबईच्या विधिमंडळ प्रांगणात हा शपतविधी सोहळा पार पडला. 36 मंत्र्यांनी मंत्रीपदाची आणि गोपानियेतेची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारानान्त्र तिन्ही पक्षातील इच्छुक आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर आता शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांनीही पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मंत्रिडळविस्तारात पश्चिम विदर्भातून एकाला मंत्रिपद मिळावं अशी मागणी खासदार गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली होती. बुलडाण्याचे शिवसेना नेते संजय रामूलकर आणि अकोल्याचे संदीप बाजोरीया यांना मंत्रिपद द्यावं अशी त्यांची मागणी होती. मात्र दिग्रसचे आमदार संजय राठोड यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात स्थान तर दिलंच त्याचबरोबर बढतीही दिली. त्यांना राज्यमंत्रिमंडळातून थेट कॅबिनेटमंत्रिपद दिलं. त्यामुळे गवळी नाराज झाल्या आहेत.
दरम्यान ठाकरे सरकार हे महाविकास आघाडीचं असल्याने मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या आहेत. इच्छुकांची जास्त असलेली संख्या आणि वाट्याला कमी आलेली मंत्रिपदं यामुळे अनेक इच्छुकांना नाराज व्हावे लागले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
