🕒 1 min read
मुंबई : विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमस्थळी फडणवीस-राऊत यांची गळाभेटही झाली होती. त्यानंतर आणखी एक राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारी घटना घडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर हे दोन्ही नेते भेटले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराचकाळ चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
‘भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. ‘आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी भेटीबाबत वक्तव्य केले असल्याने भेटीबाबत संभ्रम वाढला आहे.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत, कधीकाळी युतीमध्ये सडलो, म्हणत युती तोडली, पण नंतर परत सोबत आले, आता पुढे बघू, असं मुनगंटीवार म्हणाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीचा तपशील बाहेर येईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्याu
- ‘सारथी’चं आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता’ ; सरकारने फसवणूक केल्याचा आरोप
- हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया !
- ‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही’
- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अर्थसंकल्प तयार करणे हे फार कठीण काम होते – शहा
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
