🕒 1 min read
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानसाठी शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर भाजपनेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ‘ आर्यन खानसाठी शिवसेनेचा नेता सर्वोच्च न्यायालयात गेला असून एनसीबीच्या कामाच्या चौकशीचीही मागणी केली आहे. अमली पदार्थांच्या विरोधी लढ्यात शिवसेनेने ड्रग्स माफियांच्या बाजूने उभे रहाणे दुर्दैवी आहेच. येणाऱ्या पिढीला शिवसेना कोणत्या तोंडाने सामोरी जाणार आहे?’ असा सवाल भातखळकरांनी केला आहे.
शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आर्यन खानच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही तिवारींनी केली आहे. किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात ई-मेलद्वारे याचिका दाखल केली असून त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे.
आर्यन खानसाठी शिवसेनेचा नेता सर्वोच्च न्यायालयात गेला असून एनसीबीच्या कामाच्या चौकशीचीही मागणी केली आहे.
अमली पदार्थांच्या विरोधी लढ्यात शिवसेनेने ड्रग्स माफियांच्या बाजूने उभे रहाणे दुर्दैवी आहेच. येणाऱ्या पिढीला शिवसेना कोणत्या तोंडाने सामोरी जाणार आहे? pic.twitter.com/J11iztIewo— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 19, 2021
एकीकडे तीन हजार किलो ड्रग्ज मिळतात. मात्र मुंबई किंवा बॉलिवूडला धरून एनसीबी बदनामी करत आहे. त्यात काही लॉजिक निघत नाही. एनसीबी ही स्वतंत्र संवैधानिक संघटना असून आपल्या पदाचा गैरवापर करत आहे. आर्यनची केस ही शुल्लक केस आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. आर्यनला २४ तासासाठी अटक करण्यात आली आहे. नंतर त्याला इंटरनॅशनल पेडलर ठरवलं गेलं. मग त्यात इंटरनॅशल रॅकेटही आलं. या सर्व ट्रायलच्या गोष्टी असून त्याला बेल मिळणे हा त्याचा राईट आहे, असे तिवारी यांनी सांगितले. इतरांना जामीन होतो. त्याला १७ दिवसांपासून आत ठेवलं आहे, याकडेही त्यांनी याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
