टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज १३ दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता संघर्षाचे सत्र सुरु आहे. आज भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद देण्यासाठी भाजपने तयारी दाखवली आहे. त्यामुळे चर्चेसाठी आमची २४ तास दार उघडी आहेत, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
यावर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर भाजपने चर्चेबाबत लिखित स्वरुपात द्याव अस राऊत म्हणाले आहेत. दोन्ही पक्षांनी चर्चेसाठी आज सरकार स्थापनेच्या चर्चेबाबत अनुकूलता दर्शवली आहे.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना आज ही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. जे युती होताना ठरलं होत तेच शिवसेना मागत आहे. वेगळा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे भाजप अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देत असेल तर या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. मात्र जी काही भाजपची भूमिका असेल तर ती लिखित स्वरुपात द्यावी, असेही संजय राऊत म्हणाले.
राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांचे निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, याचा पुनरुच्चार केला. ”देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत आणि संपूर्ण भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत. तसेच राज्यामध्ये येत्या काही काळात भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन होईल,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1191689797133197314?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191686781420199936?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191686064789786624?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

