Share

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना राबवणार शिव-संपर्क मोहीम

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा (औरंगाबाद ) – शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत तसेच आगामी  महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा औरंगाबाद हा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचे हेतूने शहरात १६ जानेवारी ते ३१ जानेवारी रोजी शिव-संपर्क मोहिम राबवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री तसेच औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई ,शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ,रोजगार हामी योजना मंत्री संदिपान भुमरे , ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची सुरवात होईल.तसेच या मोहिमेत आमदार प्रदीप जैस्वाल ,आमदार संजय शिरसाट महापौर नंदकुमार घोडेले यांचीही उपस्थिती असेल.

औरंगाबाद शहरातील पूर्व – पश्चिम – मध्य विधानसभा मतदारसंघात विभागप्रमाणे या शिवसंपर्क मोहीम अंतर्गत बैठका घेण्यात येणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी माहिती दिली . ही शिव संपर्क मोहीम यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी निमित्त १३ जानेवारी रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

या शिव संपर्क मोहीम अंतर्गत १६ जानेवारी रोजी मध्य व पूर्व मतदारसंघात ,१७ जानेवारी रोजी पश्चिम व मध्य मतदारसंघात, १९ जानेवारी रोजी पूर्व व पश्चिम मतदारसंघात, २० जानेवारी रोजी मध्य व पूर्व मतदारसंघात ,२१ जानेवारी रोजी मध्य मतदारसंघात ,२५ जानेवारी रोजी पश्चिम मतदारसंघात, २६ जानेवारी रोजी मध्य मतदारसंघात ,२७ जानेवारी रोजी पूर्व मतदारसंघात सकाळ व सायंकाळच्या सत्रात बैठका होणार असून या बैठकांना शिवसेना जिल्हास्तरीय पदाधिकारी ,अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी ,आजी-माजी पदाधिकारी ,मतदान केंद्र पदाधिकारी ,यांची उपस्थिती असणे आवश्यकते बाबत आ. अंबादास दानवे यांनी सूचना केल्या.

या पूर्वतयारी निमित्त घेण्यात आलेल्या बैठकीस उपजिल्हाप्रमुख राजू राठोड ,संतोष जेजुरकर ,आनंद तांदुळवाडीकर, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे याप्रसंगी बैठकीस उपशहरप्रमुख वसंत शर्मा, किशोर कच्छवा, संतोष मरमट, बापू पवार, प्रमोद ठेंगडे, शिवा लुंगारे ,संजय हरणे ,हिरा सलामपुरे ,सुबोधकुमार गडवे, संदेश कवडे ,मकरंद कुलकर्णी, गणपत खरात, राजेंद्र दानवे, संजय बारवाल ,रमेश बहुले, चंद्रकांत इंगळे, अनिल जैस्वाल, बापू कावळे ,रवींद्र कदम आदी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!