मुंबई : राज्यात आणि विशेषतः मुंबईत खंडणी वसुलीची प्रकाराने नेहमीच समोर येत असतात मात्र आता चक्क बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेनेकडून खंडणी वसूल करत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
देशपांडे यांनी भर पत्रकार परिषेदत या संदार्भात पुरावे सदर करत सांगितले कि, ‘शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा केली होती. मात्र हॉकर्स झोन झाले नाही. आता शिवसेना फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसंच सार्वजनिक पथ आणि पद वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा आकार… असं या पावतीवर लिहिण्यात आलं आहे’,
‘फेरीवाल्यांना स्पष्टपणे सांगितलंय जातंय तुम्ही आम्हाला पैसे द्या.. महानगरपालिका तुमच्या स्टॉलला हात लावणार नाही… पोलिसांना आम्ही मॅनेज करु… बाळासाहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा, पर्यावरण मंत्र्यांचा फोटो पावतीवर लावून वसुली केली जातीय. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे’, असं म्हणत असताना संदीप देशपांडे यांच्याा डोळ्यात पाणी आलं. ‘आमची मागणी आहे की खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे. खंडणीखोरांवर कारवाई व्हायलाय पाहिजे. महानगरपालिकेची लोकं कुणी या खंडणी प्रकरणांमध्ये सामिल आहेत का याची उच्चपदस्थ झाली पाहिजे’, अशी मागणी देशपांडे यांनी केली.
‘अशा खंडणी खोरांच्या हातून मुंबई वाचवणे गरजेचे आहे. चंबळखोरांचं राज्य मुंबईत आलंय की काय? असा प्रश्न मला कधीकधी पडतो’, ‘विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार’ हे माझं ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबले होते. असा घणाघात करत त्यांनी मुंबई पोलिसांना भेटून यासंबंधीची सविस्तर तक्रार देणार आहे. पोलिसांनी या खंडणीखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- गाझीपूर सीमेवर पोलिसांनी लावलेले खिळे शेतकऱ्यांनी उपसले!
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना

