मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी शारिरीक इजा केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली होती. यानंतर अधिकाऱ्याला शारिरीक इजा करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.मात्र त्याच दिवशी काही वेळातच या शिवसैनिकांना जामीन मिळाला होता.
या शिवसैनिकांना जामीन मिळाल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेत पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन देखील केले होते. या शिवसैनिकांना जामीन मिळाल्याचे वृत्त आता समोर येत आहे. कमलेश चंद्रकांत कदम, संजय शांताराम मांजरे, राकेश राजाराम बेळणेकर, प्रताप मोतीरामजी सुंद वेरा, सुनील विष्णू देसाई आणि राकेश कृष्णा मुळीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता आज या प्रकरणी या शिवसैनिकांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. आज न्यायालयासमोर त्यांची सुनावणी होणार असून न्यायालय पोलीस कोठडी सुनावणार कि जामीन कायम ठेवणार हे महत्वाचं ठरणार आहे.
काय आहे हे प्रकरण?
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचे फक्त व्यंगचित्र व्हाट्सअप वरुन फॉरवर्ड केलं म्हणून शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना शारीरिक इजा केली. यामध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. यावरून आता वादंग पेटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांचं मरण हेच मोदी सरकारचं धोरण, सुलतानी निर्णयाविरोधात शेतकरी उतरला रस्त्यावर
- ‘कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटशूळ उठला’
- …अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, सदाभाऊ खोतांचा केंद्राला इशारा
- अशोक चव्हाणांचा आम्हाला अनुभव तर मुख्यमंत्र्यांच काम शून्य! मराठा आरक्षणावरून निलेश राणे आक्रमक
- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
